Girl Viral Video : स्कूटी वर बसून स्टंटबाजी पडली महागात तेवढ्यात तोल गेला आणि नको तेच घडले पहा व्हिडिओ

Girl Viral Video : या अपघातात दोघी गाडी सह फरपटत जात आहेत . या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी स्कूटरवरून जात असल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांच्या बाजूने काही बाईक रायडर्स जात होते. हे रायडर्स दोन्ही तरुणींना पाहून HI म्हणाले आणि पुढे निघून गेले. त्या रायडर्सनाही HI म्हणण्यासाठी म्हणून चालत्या स्कुटीवरील ती मागची तरुणी उभी राहिली आणि हात वर करून ‘हाय’ करू लागली. परंतु, त्यामुळे स्कुटी चालविणाऱ्या तरुणीचा तोल गेला. त्यातही तिनं स्कुटी सावरण्याचा पूरेपूर प्रयत्न केला; परंतु पुढच्याच क्षणी त्या अपघातास कारणीभूत ठरल्या. विशेष म्हणजे दोन्ही तरुणी हेल्मेटशिवाय स्कुटी चालविताना दिसत आहेत.

अपघाताच्या वेळी दोन्ही तरुणी स्कुटीसकट रस्त्याच्या मधोमध फरपटत गेल्या; ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यता आहे. त्या तरुणींबरोबर झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Girl Viral Video हा व्हिडीओ उत्तराखंड पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यात लिहिलं आहे की, गाडीवर स्टंट करून जीव धोक्यात घालू नका आणि दुचाकी चालविताना नेहमी हेल्मेट वापरा. त्याचबरोबर उत्तराखंड पोलिसांनी लिहिलंय की, स्टंटबाजीची नशा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकते आणि हेल्मेट तुमचे प्राण वाचवू शकते.

एका सोशल मीडिया युजरनं लिहिलं की, या देशातील लोक रीलमुळे वेडे झाले आहेत. दुसऱ्या एकानं लिहिलं की, लोक नियमांचं पालन करतात याची खात्री करण्यासाठी सरकारनं दंडाची रक्कम अनेक पटींनी वाढवली आहे; परंतु नियम मोडणाऱ्यांना काही फरक पडलेला दिसत नाही. आणखी एकानं लिहिलं की, बहिणीबरोबर गेम झाला. म्हणूनच म्हटलं नजर हटी तो दुर्घटना घटीl

Leave a Comment