Gold Rate News: सोन्याची खरेदी (Gold Rate) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करणारांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, काल दिल्लीच्या सराफा बाजारात (Delhi bullion market) सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
आजचे सोने दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या सराफा बाजारात सोन्याचा दर काय? Gold Rate
सोन्याच्या बाबतीत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेचा सण जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहेय त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या एनसीआर सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1450 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर हा 72,200 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात सोनं 70000 रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण silver rate
दरम्यान, सोन्याच्याच दरात घसरण झाली नाही, तर चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 2300 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सराफा बाजारात चांदीचा दर हा 83,500 रुपये किलो आहे. यापूर्वी चांदीचा दर हा 85,800 रुपये किलो होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण
देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात घसरण झालीय. गेल्या 22 महिन्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात 22 सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 2.7 टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याच्या मागणीत घट होत आहे. त्यामुळं दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
य हंगामात सर्वसामान्यांना दिलासा
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. यामध्ये मोठ्या प्रमामात सोन्याच्या दरात (Gold Rate) वाढ होत होती. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोन्या चांदीची खरेदी करणं कठीण झालं होतं. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यानं खरेदीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. येणाऱ्या काळात सोन्या चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय.