Jio Recharge Plan : भारतात मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती सतत वाढत आहेत. मोबाईल रिचार्जच्या किमती वाढल्याने अनेक लोक नाराज झाले आहेत. एकीकडे सर्व काही ऑनलाइन येत असताना दुसरीकडे इंटरनेट वापराचे शुल्कही सातत्याने वाढत आहे. दरम्यान, रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी ८४ दिवसांऐवजी ९० दिवसांचा प्लॅन लॉन्च केला आहे.
ग्राहकांना आता फक्त 749 रुपयांमध्ये 90 दिवसांसाठी 20GB अतिरिक्त डेटासह दररोज 2GB डेटा दिला जाईल. तसेच, सर्व ग्राहकांना 90 दिवसांसाठी दररोज अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाईल.
Jio Recharge Plan तुम्ही रिलायन्स जिओच्या 749 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज केल्यास आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल, तर तुम्ही रिलायन्स जिओच्या अमर्यादित 5G प्लॅनचा लाभ देखील घेऊ शकाल.