NEET Re-exam 2024 एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट- यूजी परीक्षेतील १,५६३ उमेदवारांना सवलतीचे (ग्रेस) गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या उमेदवारांना २३ जून रोजी पुन्हा चाचणी देण्याचा पर्याय दिला जाईल. यापैकी ज्या उमेदवारांनी फेरचाचणी न दिल्यास ग्रेस गुण वगळून मूळ गुणांच्या आधारे निकाल दिला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. नीट-युजी परीक्षेतील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांमुळे ही परीक्षा रद्द करण्यासह ग्रेस गुणांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात अलख पांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेसह विविध याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या सुटीतील खंडपीठापुढे सुनावणी झाली. दोन दिवसांपूर्वी खंडपीठाने ही परीक्षा रद्द करणार नसल्याचे स्पष्ट करत प्रवेशासाठीच्या समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देणार नसल्याचे म्हटले होते. केंद्र सरकार व
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
एटीएला उत्तर देण्याचे आदेश दिले
आठ जुलै रोजी पुढील सुनावणी
■ नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) २३ जूनला फेरपरीक्षेचे आयोजन केले आहे. दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या वेळेत परीक्षा
होईल.
■ पुनर्परीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर केला जाईल आणि एमबीबीएस, बीडीएस, इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे समुपदेशन
६ जुलैपासून सुरू होईल, असे केंद्र सरकारने सांगितले. याचिकेवरील पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे.
बंगालमध्ये निदर्शने
नीट-यूजी परीक्षेतील कथित अनियमिततांबद्दल पश्चिम बंगाल उच्च शिक्षण विभागाच्या सॉल्ट लेक येथील मुख्यालयाजवळ ‘ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन’च्या सदस्यांनी निदर्शने केली. विकास भवनाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून दूर नेले.
NEET Re-exam नीट-यूजी परीक्षेत पेपर फुटल्याचा कोणताही पुरावा नाही. विरोधकांकडून केले जाणारे आरोप निराधार आहेत. एनटीए ही अतिशय विश्वासार्ह संस्था आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे आणि आम्ही त्याच्या निर्णयाचे पालन करू. कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. – धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री