Lucky Viral Video माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होतेच. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो, तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं धस्स होईल. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल.
Lucky Viral Video तर झालं असं की, नेहमीच्या पुलावरून एक व्यक्ती घरी जाण्यासाठी आली, पण पावसामुळे त्या पुलावरून पाणी वाहत होतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुलावरून हे पाणी वाहत आहे. मात्र, पाण्याला फारसा जोर सुरुवातीला दिसत नसल्यानं या व्यक्तीने त्या पाण्यातून त्याची गाडी काढण्याचा निर्णय घेतला अन् गेला. मात्र, पुलाच्या मधोमध पोहचताच पाण्याचा जोर वाढला अन् व्यक्तीला गाडी पुढे घेऊन जाण्यास अडथळा येऊ लागला. ती व्यक्ती आणि त्याची गाडी त्या पाण्याच्या प्रवाहात ओढली जाऊ लागली. मात्र, या व्यक्तीने प्रयत्नाने गाडी पुलावरून पुढे नेली आणि बघता बघता पूरच आला. केवळ काही सेकंदातच तो पूलही वाहून गेला. ही व्यक्ती या घटनेत थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ