Gold Price Today सोने-चांदीत मोठी स्वस्ताई आली आहे. चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात घसरणीचे सत्र आहे. तर मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र सुरु आहे.
देशात लोकसभेच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहे. एनडीएला बहुमत मिळाले असले तरी घटक पक्षांचे महत्व वाढले आहे. त्याचा दुरगामी परिणाम व्यापार क्षेत्रावर पण दिसेल. निकालाअगोदर सोने-चांदीत मोठी घसरण दिसली. तर निकालानंतर दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंनी उसळी घेतली होती. आज बेशकिंमती धातूत पडझड झाली. चांदीला मोठा फटका बसला. तर सोने स्वस्त झाले. अशा आहेत किंमती Gold Price Today
सोन्यात चढउताराचे सत्र
30 मेपासून दरवाढीला ब्रेक लागला होता. 4 जून रोजी सोन्याने मोठी मुसंडी मारली. 760 रुपयांनी सोन्यात दरवाढ झाली. या आठवड्यात चढउताराचे सत्र आहे. सुरुवातीला 3 जून रोजी 440 रुपयांची घसरण झाली. तर 5 जून रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.Gold Price Today
चांदी 2300 रुपयांनी आपटली
30 मेपासून चांदीत मोठी घसरण झाली होती. किंमती पाच हजारांनी खाली आल्या होत्या. 4 जून रोजी चांदीने 1200 रुपयांची उसळी घेत या घसरणीला ब्रेक लावला होता. 5 जून रोजी किंमतीत 2300 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,700 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले तर चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,986 रुपये, 23 कॅरेट 71,698 रुपये, 22 कॅरेट सोने 65,939 रुपये झाले. 18 कॅरेट 53,990 रुपये, 14 कॅरेट सोने 42,112 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,530 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.Gold Price Today