Driving Licence Rules | महत्वाची बातमी ! ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये 1 जुलै पासून होणार मोठे बदल

Driving Licence Rules | वाहन चालवत असताना ड्रायव्हिंग लायसन असणे खूप महत्त्वाचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवताना खूप गरजेचे आहे. आपल्याला माहीतच आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे वाहतुकीचा परवाना काढायचा असेल, तर त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया असते. ती गुंतागुंतीची आणि अवघड देखील असल्यामुळे अनेक लोक ड्रायव्हिंग लायसन काढण्याकडे दुर्लक्ष करतात.

ड्रायव्हिंग लायसन (Driving Licence Rules) काढण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. फॉर्म भरावा लागतो. त्याचप्रमाणे पैशांची देवाण-घेवाण आणि गैरव्यवहार देखील होण्याची यामध्ये शक्यता असते. या सगळ्या गोष्टी लक्षात असल्यामुळे आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून वाहतूक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासोबतच 1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्स जे काही नियम आहे. त्यात देखील बदल केले जाणार आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये 1 जुलै पासून बदल | Driving Licence Rules

आपल्याला जर सध्या ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल, तर त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आपल्याला जाऊन परीक्षा द्यावी लागते. परंतु या नियमांमध्ये आता बदल करण्यात आलेला असून नवीन नियमानुसार अर्जदार हे त्यांच्या पसंतीचे आणि सर्वात जवळच्या केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंगची चाचणी देखील देऊ शकतात.

एखाद्या खाजगी एजन्सीकडे ड्रायव्हिंग परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी सरकारकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल अशा वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे वैद्य लायसन्स शिवाय वाहन चालकांना 2 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. अल्पवयीन चालक सापडला तर 25 हजार रुपयांचा दंड आणि त्याच्या पालकावर कारवाई करण्याची शक्यता देखील आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Driving Licence Rules कोणत्या प्रकारच्या परवान्यामध्ये कोणती कागदपत्रे हवी याची यादी आता अर्जदाराला देण्यात येणार आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी जी काही कागदपत्रे लागतात. त्याची पूर्तता आपल्याला सहज करता येणार आहे

ड्रायव्हिंग लायसन्स संबंधीच्या शुल्कामध्ये बदल

  • शिकाऊ परवाना अर्जातील करता 150 रुपये शुल्क
  • शिकऊ परवाना चाचणी शिल्पासाठी 50 रुपये शुल्क
  • ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क 300 रुपये
  • ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी 200 रुपये शुल्क
  • आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन 1 हजार रुपये शुल्क
  • परवण्यामध्ये दुसऱ्या वाहनाचा वर्ग जोडायचा असेल तर 500 रुपये
  • परवानाचे नूतनीकरण करायचे असल्यास 200 रुपये
  • परवानावरील पत्ता बदलायचा असल्यास 200 रुपये

Leave a Comment