Solar pump केंद्र सरकारच्या माध्यमातून सबंध देशभर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात महा कृषी ऊर्जा अभियान राबविले जात आहे. अलीकडेच राज्यात कुसुम-ब योजना अर्थातच कुसुम योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. पात्र तसेच इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
किती क्षमतेचे सौर कृषी पंप मिळतात?
प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ एचपी, ५ एचपी आणि ७ एचपी कृषी सोलर पंपांचे वाटप करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून महा ऊर्जास १ लाख ४ हजार ८२३ सौर कृषी पंप बसविण्यासाठी मान्यता दिली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अनुदान किती मिळते?
Solar pump सदर योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे उर्वरित ५ टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते. तसेच इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी सौर पंप खरेदी करण्यासाठी ९० टक्के अनुदान दिले जाते. तसेच उर्वरित १० टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागते.
अर्ज कुठे करायचा? येथे क्लिक करून पाहा
Solar pump इच्छुक तसेच पात्र शेतकऱ्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. यासाठी शेतकऱ्यांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. राज्यात नुकताच पीएम कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.