Viral Video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बिबट्या गवताळ प्रदेशात शिकारीच्या शोधात फिरताना दिसत आहे; त्यावेळी त्याला दूरवर एक रानडुक्कर दिसते.
Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्यूज मिळवतात. सध्या असाच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक बिबट्या रानडुकराची शिकार करताना दिसत आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
स्वतःची भूक भागविण्यासाठी लोक दिवस-रात्र कष्ट करतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात वाघ रानडुकराची शिकार करताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बिबट्या गवताळ प्रदेशात शिकारीच्या शोधात फिरताना दिसत आहे; त्यावेळी त्याला दूरवर एक रानडुक्कर दिसते. त्यावेळी तो हळूच गवतामध्ये लपून रानडुक्कर जवळ येण्याची वाट पाहतो. रानडुक्कर पुढे येताच बिबट्या त्याच्यावर झडप घालतो आणि त्याला आपल्या जबड्यात पकडतो, त्यावेळी रानडुक्कर मोठ्याने कळवळते, पण बिबट्या त्याला तोंडामध्ये पकडून घेऊन जातो. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Latest Sightings या अकाउंटवर शेअर केला असून यावर आतापर्यंत जवळपास ६३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “हा बिबट्या एक उत्तम शिकारी आहे.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “बिबट्या माझा फेवरेट प्राणी आहे.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “परफेक्ट व्हिडीओ क्लिक केला आहे.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “इथे प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो.”
दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत वाघाने तळ्यात पाणी पिणाऱ्या हरणाची शिकार केली होती, तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काही सिंहाचे शावक म्हशीची शिकार करताना दिसले होते.Viral Video