Rations Card Ban मोदी सरकारचा मोठा निर्णय या लोकांचे राशन कार्ड होणार बंद जाणून घ्या संपूर्ण माहिती देशभरातील कोट्यवधी लोक मोफत सरकारी रेशनचा लाभ घेत आहेत. पण आता सरकार चुकीच्या मार्गानं रेशन मिळवणाऱ्या लोकांचं रेशन बंद करणार आहे. सरकारनं अलीकडेच देशभरातून 10 लाख बनावट शिधापत्रिका ओळखल्या आहेत.
अश्या नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करा.
Rations Card Ban या शिधापत्रिका लवकरच रद्द करून त्यांच्या रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. ज्यांची शिधापत्रिका बनावट असल्याचं आढळून आले, त्यांच्याकडून सरकार रेशनची वसूलीही करणार आहे. वास्तविक, देशभरातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत रेशन कार्डचा लाभ घेत आहेत. पण ही सुविधा घेण्यास पात्र नसलेले करोडो लोक देशात आहेत. असं असतानाही ते वर्षानुवर्षे मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत आहेत. अलीकडेच सरकारनं 10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली आहे.