Governments scheme गाय गोठ्या साठी मिळणार १ लाख ५० हजार रुपये अनुदान
Government schemes for cow Farming : पशुसंवर्धन विभागाकडुन राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. दि. ३१ जानेवारी, २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रति गायीची किंमत रु.७०,०००/- व प्रति म्हशीची किंमत रु.८०,०००/- करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.
कागदपत्र जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करणे या योजनेस शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. सदरची योजना राज्यात सन २०२३ २४ या आर्थिक वर्षापासुन राबविण्यात यावी.
या योजने अंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास ०२ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट ५० टक्के अनुदानावर तर अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर वाटप करण्यात यावा. या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास दुधाळ जनावरांसाठी गोठा बांधकाम, कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा व खाद्य साठवणुक शेड बांधकाम या बाबींसाठी कोणतेही अनुदान देय राहणार नाही. सर्वसाधारण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित ५० टक्के रक्कम तसेच, अनुसूचित जाती / आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित २५ टक्के रक्कम स्वतः अथवा बँक / वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभी करावी लागेल.
गाय गोठा अनुदान योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा ?