Fertilizer of Prices नमस्कार मित्रांनो आता थोड्या दिवसात पाऊस सुरू होईल व सर्व शेतकरी पेरणीला लागतील पेरणी करण्यासाठी खत बी बियाणे या सर्वांची खूप आवश्यकता भासते शेतकऱ्याला खताचे भाव माहित नसल्यामुळे दुकानदार शेतकऱ्याला कुठल्याही किमतीत खताचे भाव लावून विकतो यामुळे शेतकऱ्याचा खूप छळ होतो पण आता शेतकऱ्याला ही पाहता येणार खताचे भाव तेही आपल्या मोबाईलवर पहा कसे ते.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, 2024 च्या खरिप हंगामात खतांच्या किंमतीत एका रुपयानेही वाढ होणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती वाढल्या असल्या तरी त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या वर्षीच्या दरानेच खतं मिळतील, असा विश्वास त्यांनी दिला.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
रासायनिक खतांवरील सबसिडी ‘न्युट्रिएंट बेस्ड सबसिडी’ (NBS) या योजनेअंतर्गत दिली जाते. या योजनेत खतातील पोषकद्रव्यांच्या प्रमाणानुसार सबसिडी दिली जाते. नायट्रोजन (N), फॉस्फेट (P), पोटॅश (K) आणि सल्फर (S) या घटकांच्या प्रमाणानुसार अनुदानाची रक्कम ठरविली जाते.
सबसिडीची मोठी रक्कम
केंद्र सरकारनं 2024 च्या खरिप हंगामासाठी फॉस्फेट आणि पोटॅश खतांवर 24 हजार 420 कोटी रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. हा निर्णय फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आला. सामान्यपणे असा निर्णय एप्रिल-मे महिन्यात घेतला जातो, पण यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे हा निर्णय वर्षाच्या सुरुवातीलाच घेण्यात आला.
Fertilizer of Prices केंद्र सरकारनं मोठी रक्कम अनुदान म्हणून जाहीर केली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील खतांच्या किंमतींच्या वाढीचा परिणाम याखतांच्या किंमतीवर होणारच आहे. त्यामुळे ही सबसिडी पुरेशी ठरेल का, याबाबत शंका निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना खतं परवडतील की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.