IMD Weather Forecast भारतीय हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवस पुन्हा एकदा राज्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. दरम्यान येत्या २४ ते ४८ तासांत राज्यातील काही भागांत सर्तकतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
घाटमाथा, उत्तर कोकणात अतिवृष्टी
भारतीय हवामान विभागाने आज ३ ऑगस्ट आणि उद्या ४ ऑगस्ट रोजी मध्यमहाराष्ट्रातील घाट भागात आणि उत्तर कोकणात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याची सूचना देखील हवामान विभागाने या भागांत दिली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
येत्या २४ तासांत कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार
IMD Weather Forecast आयएमडीने दिलेल्या बुलेटिननुसार, शनिवार ३ ऑगस्ट ते ६ ऑगस्टपर्यंत एकत्रित राज्यभर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी वाढण्याची शक्यता आहे. तसेच महराष्ट्राच्या अंतर्गत भागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत कोकण विभागाच्या काही भागांमध्ये (पालघर, ठाणे, मुंबईच्या आसपास) आणि मध्यमहाराष्ट्राच्या घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
‘या’ भागांना अलर्ट
रेड अलर्ट: ३ जुलै – सातारा, ४ जुलै – सातारा, पुणे आणि पालघर
ऑरेंज अलर्ट: ३ जुलै – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर, ४ जुलै – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, ५ जुलै – सातारा
IMD Weather Forecast यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (३ जुलै ते ७ जुलै), कोल्हापूर (४ जुलै) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर (५ जुलै), रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा (दि. ६ ऑगस्ट)