Old Pension Scheme News : महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व कर्मचाऱ्यांची जुनी
पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी ही जिव्हाळ्याची आणि प्रमुख मागणी आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने द्वारा अनेक आंदोलने, मोर्चे करण्यात आलेले आहेत.
ज्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार असून या आंदोलनात माझ्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेतृत्वाने सुद्धा प्रत्यक्ष येवून आपणास पाठिंबा दिलेले आहे.
महाराष्ट्रासह देशातील तमाम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी, खासगीकरण बंद व्हावे, बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.
देशात काँग्रेस ची सत्ता असणाऱ्या राज्यात जसे राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड मध्ये जुनी पेंशन योजना लागू करण्यात आलेली आहे.
कर्नाटक आणि तेलंगणा मधील काँग्रेस चे सरकार लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे.
महाराष्ट्र राज्यात देखील 1982 84 ची जुनी पेंशन योजना लागू व्हावी ही आमची जाहीर भूमिका आहे.
राज्यात व देशात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर हे आश्वासन आम्ही नक्कीच पूर्ण करू असा विश्वास देतो.