Ration Card Scheme : अनेक वर्षांनंतर केंद्र सरकारने रेशनकार्ड योजनेत मोठ्या बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गहू आणि तांदळासोबतच आता 20 वस्तूंचा समावेश केला जाणार आहे. या बदलामुळे गरीब कुटुंबांना मुलभूत गरजा भागवण्यास मदत होईल. फायदे आणि महत्त्व रेशनकार्ड योजनेमुळे गरीब आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मोठी मदत मिळते. या योजनेमुळे अन्नधान्य आणि गृहोपयोगी वस्तू परवडणार्या किंमतीत मिळतील. दारिद्र्यरेषेखालील लोकांना मदत होईल आणि बेरोजगारी आणि दारिद्र्यामुळे होणार्या पोषण अभावातून बाहेर पडण्यास मदत होईल.
योग्य कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अनेकदा लोक या सवलतींपासून वंचित राहतात. दुरवर भागांमधील गावांतील लोकांना या योजनेबद्दल माहिती नसल्याने त्यांना फायदा मिळत नाही. तसेच रेशनकार्ड मिळवण्यासाठी अनेकदा भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते. अशा विविध समस्यांमुळे रेशनकार्ड योजनेचा फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही.
Ration Card Scheme सध्या देशातल्या 80 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना गरीब कल्याण योजनेचा फायदा मिळतो आहे. आतापर्यंत सरकारनं 10 लाख कार्डधारकांची रेशन कार्ड्स रद्द केली आहेत. अनेक अपात्र नागरिक रेशन सुविधेचा लाभ घेतात. त्यामुळे सरकारनं सर्व अपात्र नागरिकांची रेशन कार्ड्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्र कार्डधारकांची माहिती डीलरकडे पाठवून त्याद्वारे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसंच त्यांच्याकडून वसुलीही केली जाईल.