केक बनवण्याचा कारखाना पाहिलाय? व्हिडिओ पाहून केक खाणं सोडून द्याल | Cake Making Desi Jugaad

Cake Making Desi Jugaad : एखाद्याचा वाढदिवस असला की केक कापणे आणि पार्टी करणे हे ठरलेलं असतं. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, कंपनीत एखादं टार्गेट पूर्ण झालं की आयोजित केलेला कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमात केक कापले जातात. तर अनेकदा आपण खायची इच्छा झाली तरी केक विकत घेत असतो.

पण प्रत्येकाच्या वाढदिवसाला आनंदात कापला जाणारा केक कसा बनवला जातो ते माहितीये का?सध्या केक बनवणाऱ्या एका कारखान्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्यामध्ये अंडी एका बादलीत फोडून त्यामध्ये पीठ मिसळलं जात आहे. त्यानंतर त्यापासून केक बनवण्याची पूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. तर या सगळ्या व्हिडिओमध्ये कारखान्याची अंतर्गत स्वच्छता पाहिली तर आपल्याला केक पुन्हा खाण्याची इच्छा होणार नाही. 

👉👉येथे क्लिक करून पहा केक बावयचा कारखाना…👈👈

या कारखान्यामध्ये काम करणारे व्यक्तींनी सुद्धा स्वच्छतेचे कोणतेच नियम पाळले नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ भारतातील आहे की बाहेरचा आहे यासंदर्भात माहिती समोर आली नाही. पण अनेक बेकरी आणि केक बनवण्याच्या कारखान्यामध्ये अशी परिस्थिती असते. तर काही बेकऱ्यांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते. त्यामुळे आपण ज्या बेकरीतून केक किंवा बेकरी प्रोडक्ट खरेदी करतो ते प्रोडक्ट कसे बनवले जातात हे पाहिले पाहिजे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आम्हाला तर केक कसे बनवतात ते माहिती नव्हतं.. पण आत्ता कळालं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.Cake Making Desi Jugaad

येथे क्लिक करा आणि पाहा…

Leave a Comment