Viral video सर्व प्राण्यांमध्ये मानव हा सर्वात बुद्धीमान प्राणी आहे असे म्हटले जाते. लहानपणापासून आपल्याला काय योग्य-काय अयोग्य शिकवले जाते तरीही अनेकदा आपल्याला त्याचा विसर पडतो. चुकीचे आहे माहित असूनही अनेक लोक सरार्सपणे नियमांचे उल्लंघन करतात ज्यामुळे तो स्वत:बरोबर इतरांचा जीव धोक्यात घालतात. पण मुक्या प्राण्यांना मात्र एकदा एखादी गोष्ट शिकवली तर ती ते कधीही विसरत नाही. मग तो प्रामाणिकपणा असो, दुसऱ्यांवर भरभरून प्रेम करणे असो की नियम पाळणे असो. माणसापेक्षा मुके प्राणी खुप चांगल्या पद्धतीने नियमांचे पालन करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका शिस्तप्रिय कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा रस्ता ओलांडताना वाहतूकीच्या नियमांचे पालन करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Viral video व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगसमोर उभा आहे. शिस्त प्रिय कुत्रा रस्त्याच्या बाजूला उभा आहे तर त्याच्या समोर एक महिला झेब्रा क्रासिंगवरच उभी असलेली दिसते. लाल सिग्नल असल्यामुळे वाहनांची ये-जा सुरु आहे. सिग्नल लाल असतानाच महिला थेट सिग्नल क्रॉस करून निघून जाते. पण कुत्रा मात्र लाल सिग्नल हिरवा होईपर्यंत तिथेच थांबतो. सिग्नल हिरवा झाल्यानंतर रस्ता ओलांडतो. शिस्तप्रिय कुत्र्याची ही कृती पाहून नेटकरी खूश झाले आहे. वाहतुकीचे नियमांचे पालन करावे हे जर मुक्या प्राण्याला कळत असेल तर माणसांना अजून का समजत नाही. इंस्टाग्रामवर malladi_rag’s नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की