Kitchen Jugaad Video: गरम गरम तव्यावर ठेवा अंघोळीचा साबण; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही साबण फक्त अंघोळीसाठीच नाहीतर अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतोय…कंस? चला जाणून घेऊयात. अंघोळीचा साबण गरम तव्यावर ठेवताच कमाल झाली आहे. याचा परिणाम असा की पाहूनच तुम्ही चकीत व्हाल. या गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
अश्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तर हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय
गरम गरम तव्यावर ठेवा अंघोळीचा साबण
गरम गरम तवा, त्यावर साबण टाकायचा आहे. एका गृहिणीने दाखवलेला हा किचन जुगा़ड. ज्याचा परिणाम जबरदस्त असा आहे. एकदा का तुम्ही पाहाल तर वारंवार हा उपाय कराल. चपाती किंवा पराठा बनवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये लोखंडी तव्याचा वापर केला जातो. कारण त्यावर रोटी किंवा चपात्या चांगल्या प्रकारे फुगून येतात. यासोबतच या तव्याची देखभालही सोपी आहे. बरेच लोक हा तवा रोज धुण्याऐवजी आठवड्यातून एकदाच धुतात. त्यामुळे तवा सतत वरच्या वर जळाल्यामुळे आणि नियमित साफसफाई न केल्याने त्यावर काळा थर साचतो. मात्र या उपायामुळे तुमचं हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे तेही तव्याला हात न लावता
महिलेने व्हिडीओत दाखवल्यानुसार तुम्हाला सर्वात आधी तवा गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचा आहे. गॅस चालू असतानाच तव्यात अंघोळीचा साबण किसून टाकायचा आहे. यात पाणी ओतायचं आहे. मग यात बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा आणि व्हिनेगर टाकायचं आहे. व्हिनेगरऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता. यानंतर हे सर्व तव्यावर ते नीट पसरलेलं असतं. आता हा तवा नीट स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही पाहू शकता, अंघोळीचा साबण त्यावर लावल्याने हा काळपटपणा सहज निघाला. या उपायामुळे तुमचं हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे तेही तव्याला हात न लावता