Mansun alert शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसा संदर्भात आजच्या दरम्यान राज्यात मोठ्या वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच मागील 24 तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या पावसाला सुरुवात झालेली आहे.
तर मित्रांनो जाणून घेऊया आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे याविषयी.
मित्रांनो लगेच दुपारनंतर आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटाच ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस सुरू होणार आहे.
आजचे हवामान अंदाज येथे क्लिक करून पाहा
तसेच कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि सायंकाळी देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मराठवाड्यात पहिले स्थान छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये आज सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरणासह मोठ्या वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव ,नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री दरम्यान आणि मध्यरात्रीला देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे.
Mansun alert विदर्भातील, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम च्या परिसरामध्ये आणि अकोला, अमरावतीच्या काही भागांमध्ये आज रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळू शकतो मात्र नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल काही परिसरामध्ये वादळीवारा देखील सुटलेला पाहायला मिळेल तर या भागात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा असेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा.