Maharashtra Farmers Loan नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी पडलेला दुष्काळ व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणला आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी राजा मात्र अडचणीत आला आहे.
गेल्या वर्षीचे कर्ज परतफेड न केल्याने एकीकडे शेतकऱ्यांना बँकांकडून नवीन कर्ज देखील मिळत नाहीये दुसरीकडे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. नेमकं तेलंगणा सरकारने चाळीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील आशा लागली आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी व्हावी. तेलंगणा सरकारच्या या निर्णयाने राज्यातील काही नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी करत आहेत.
नेमकं तेलंगणा सरकारने काय निर्णय घेतला महाराष्ट्रात कर्जमाफीचा निर्णय घेतला जाऊ शकतो का? महाराष्ट्रातील नेत्यांनी काय मागणी केली याची सविस्तर माहिती पाहूया.
तेलंगणा सरकारने नेमका काय निर्णय घेतला तेलंगणामधील काँग्रेस सरकारने नुकतेच चाळीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी 31 हजार कोटी शेती कर्जा मंजुरी नुकतीच दिले शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती अगदी त्याचप्रमाणे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे 15 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्याचे कर्ज सरकार माफ करेल असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे जवळपास गेला एक वर्षात 600 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि याचे मूळ कारण म्हणजे शेतमाला योग्य न मिळणारा भाव आणि कर्जमाफी तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळावी अशी आशा आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे महाराष्ट्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी करतात शेतकरी संकटातून बाहेर निघावा यासाठी अनेक नेते यावर बोलले आहेत.
संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
Maharashtra Farmers Loan स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे ही नुकतेच कर्जमाफी संदर्भात बोलले आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असं देखील यावेळी राजू शेट्टी म्हणाले शेतकऱ्या ंना कर्जमुक्ती करण्यासाठी राज्यात एक जुलैपासून आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा यवतमाळ आंदोलनाची सुरुवात करणार आहे असं देखील ते म्हणाले यातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे.